Posts

Showing posts from December, 2020

प्रेम की मैत्री १

Image
  प्रेम की मैत्री १ "ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते,कारण ते क्षण काही गोड आठवणी आणि न विसरणारा अनुभव देऊन गेले". त्या वेळेस नौकरी बदलणे हा   माझ्या  साठी  ट्रेनड झाला होता. गेल्या काही वर्षात मी कुठलयाच  कंपनी मध्ये वर्षभर टीकलो  नव्हतो. त्यात पुन्हा नवीन  जॉब शोधायला खुप अवघड होते.माझे मित्र खुप मदत करायचे मला नविन जॉब शोधणयासाठी, जुना जॉब  सोडण्याआधी मी सर्व  मित्रांना  कॉल केला.त्यात ऐका मित्राने सांगितले  माझ्या इथे  वेकेन्सी आहे.त्या कंपनी मध्ये आगोदर पण काम केलेले. फक्त डिपार्टमेंट वेगळे होते.  जुना जॉब सोडून नवीन कंपनीमध्ये जॉईन झालो, तसे सर्वच मनमिळावू स्वभावाचे होते. इन्शुरन्स कंपनी असल्या मुळे  कामाचा जास्त लोड  नव्हता, फक्त मंथ एंड ला जास्त  वेळ थांबायला लागायचे.  मित्राचा अगोदरच ग्रुप असल्यामुळे लवकर मित्र बनले. जेवणाचा ब्रेक एक तास  घ्यायचो त्यामध्ये बाजूला असलेला मॉल किंवा बाहेर फिरुन यायचो. असेच चालू होते बघता बघता फेब्रुवारी अर्धा  महिना संपला. मार्च महिना फायनान्शियल एअर असल्यामुळे कामाचा लोड जास्त येणार होता. त्यामुळे कंपनीने नवीन भरती चालू